नाशिक – सिगारेट देण्यास नकार दिल्याने टोळक्याने एकास शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याची घटना विजय ममता थिएटरजवळ, नाशिकरोड येथे घडली. याप्रकरणी रवी अशोक शिंदे उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी टाकळी येथील सुग्या उर्फ सुगंध निर्मल, दादू संसारे, विनोद राजू वाकळे यांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रवी शिंदे यांचा भाऊ प्रशांत हे पाणटपरीवर आले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ आले. त्यांनी त्यांच्याकडे सिगारेट मागितली. त्यावेळी प्रशांत यांनी सिगारेट देण्यास नकार दिल्या. राग अनावर झाल्याने संशयितांनी संगतमताने प्रशांत यांना शिवीगाळ व मारहाण केली. तू येथे टपरी कशी चालवतो, रात्रीतून तुझी टपरी फोडतो, अशी धमकी संशयितांनी प्रशांत यांना दिली.
पुढील तपास पोलीस हवालदार शेजवळ करत आहेत.