नाशिक – जुन्या भांडणातून टोळक्याची मारहाण; चार जणांविरुध्द गुन्हा दाखल
नाशिक : जुन्या भांडणातून टोळक्याने एकास शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना म्हाडा कॉलनी, वडाळागाव, इंदिरानगर येथे घडली. याप्रकरणी दीपक राजू पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी म्हाडा कॉलनी, वडाळागाव येथील संशयित दादासाहेब नेटारे, आकाश नेटारे, कैलास नेटारे, चिंतामण त्र्यंबक नेटारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयित दादासाहेब नेटारे यांनी स्टंपने दीपक पाटील यांना मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी पाटील यांना शिवीगाळ व मारहाण केली. पुढील तपास पोलीस हवालदार निकम करत आहेत.
भद्रकाली भागात किरकोळ कारणातून एकाला मारहाण
नाशिक : किरकोळ कारणातून कामगाराने एकाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घास बाजार, भद्रकाली येथे घडली. याप्रकरणी विकी संजय इंगळे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित रहीम चिकनवाला दुकानातील कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विकी इंगळे दुकानासमोरील ड्रममधून पाणी घेत होते. त्यावेळी संशयिताने तू ड्रममधून पाणी का काढतो, असे म्हणत वाद घातला. त्यानंतर संशयिताने शिवीगाळ करत विकीस मारहाण केली. पुढील तपास पोलीस नाईक सूर्यवंशी करत आहेत.