मासे खरेदी करणे पडले महागात; दुचाकी गायब
नाशिक : दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना मच्छी मार्केट, भद्रकाली येथे घडली. याप्रकरणी श्रीराम गोविंद राठोड यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीराम राठोड मासे खरेदी करण्यासाठी मच्छी मार्केटमध्ये दुचाकीवरुन आले. मार्केट परिसरात त्यांनी दुचाकी पार्क केली. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. ते पार्किंग ठिकाणी आले असता दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस हवालदार भोईर करत आहेत.
नाशिक – जॉगिंग ट्रॅक परिसरातून दुचाकी लंपास
नाशिक : दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, स्पार्क फर्निचर दुकानासमोर घडली. याप्रकरणी दीपक भागवत यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक भागवत यानी दुचाकी स्पार्क फर्निचर दुकानासमोर पार्क केली होती. यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. ते पार्किंग ठिकाणी आले असता दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस हवालदार गाढवे करत आहेत.









