नाशिक : दारू दुकान फोडून चोरट्यांनी गल्यातील रोकड लांबविली. ही घटना हनुमाननगर भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपीनकुमार द्वारीका यादव (रा.स्नेहबंधन पार्क) यांनी तक्रार दाखल केली आहे. यादव यांचे हनुमाननगर येथील प्रितम कॉम्प्लेक्स मध्ये बॉम्बे वाईन्स नावाचे मद्यविक्रीचे दुकान आहे. गुरूवारी (दि.११) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे शेटरचे कुलूप तोडून दुकानातील काऊंटरच्या गल्यातील सुमारे ५० हजाराची रोकड चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.