नाशिक : कारखान्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी अॅल्युमिनीअमचे सुमारे एक लाख रूपये किमतीचे बार चोरून नेले. ही घटना औद्योगीक वसाहतीतील ललित हायड्रोलीक कंपनीत घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवेदिता ललित शिकारे (रा.सावरकरनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. ललित हायड्रोलिक कंपनीचे शुक्रवारी (दि.१२) अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रील कापून ही चोरी केली. कारखान्यात शिरलेल्या चोरट्यांनी अॅल्युमिनीअमचे सुमारे १ लाख रूपये किमतीचे दहा बार चोरून नेले. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.