नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून, ऐन सणासुदीच्या काळात वेगवेगळया भागात राहणा-या सहा जणांनी आत्महत्या केली. त्यातील एकाने विषारी औषध सेवन करून तर अन्य पाच जणांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. मृत व्यक्तींच्या नैराश्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी आडगाव,उपनगर,पंचवटी,गंगापूर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नांदूरगावातील प्रविण संभाजी वाघमारे (४२ रा.चांदशा दर्गाचे मागे,निसर्गनगर) यांनी गेल्या मंगळवारी (दि.२) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ धाडीवाल हॉस्पिटल येथे दाखल केले होते. शनिवारी (दि.७) त्यांची प्रकृर्ती खालवल्याने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार ढिकले करीत आहेत. नाशिकरोड येथील लोखंडे मळयात राहणा-या सचिन हिरामण आहिरे (३३ रा.विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ) यांनी शनिवारी (दि.६) रात्री आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. दुसरी घटना जेलरोड भागात घडली. सुरेश शाहूजी बर्वे (६३ रा.अभिनव शाळेजवळ,सप्तशृंगी नगर) या वृध्दाने आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून कपाटाच्या अंगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. दोन्ही घटनांप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.
दिडोंरीरोड भागातील कुणाल मदन पवार (३६ रा.शिवशंकर सोसा. लोकसहकार नगर) या युवकाने रविवारी (दि.७) आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वणवे करीत आहेत. औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणाºया गौतम रामप्रसाद सोळसे (३६ रा.आकाश अपा.पाण्याच्या टाकी जवळ) या युवकाने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. गेली तीन ते चार दिवस घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाºयांनी पोलीस आणि अग्निशमनदलास पाचारण केल्याने ही घटना निदर्शनास आली. सदर व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले असून याप्रकरणी उत्तम रोकडे यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत. तर भारतनगर येथील मिना बापू माळी (रा.म्हाडा कॉलनी) या ४० ते ४५ वर्षीय महिलेने रविवारी (दि.७) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच तिला जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.