नाशिक : अज्ञात टोळक्याच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ५८ वर्षीय इसमाचा मृत्यु झाला. ही घटना विहीतगाव भागात घडली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मण आप्पा यादव (रा.गायकवाड मळा,गोरेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. यादव यांना शनिवारी (दि.६) रात्री अज्ञात टोळक्याने बेदम मारहाण केली होती. ही घटना विहीतगाव येथील म्हसोबा मंदिराजवळील इश्वर संकल्प बिल्डीग भागात घडली होती. या घटनेत यादव गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.