सातपूर : सातपूरला शिवसेना पदाधिका-यांसह दोघांवर चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे. अशोक नगर येथील जाधव संकुल येथील अहिल्याबाई होळकर चौक येथे शनिवार सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी संतोष ढमाळ यांस अटक केली आहे. जखमींना रुग्णालयात उपचार साठी हलवण्यात आले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेत शिवसेना महाराष्ट्र कामगार शक्ती सेनेचे राज्य उपाध्यक्ष शाम फर्नांडिस व जाधव संकुल येथील रहिवासी सागर जाधव ,राजू गवळी ,यांच्यावर ऐन दिपावलीत भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान चॉपरने वार करण्यात आले. अहिल्याबाई होळकर चौक येथे संशयित आरोपी मद्य प्राशन करून भाऊ सोबत भांडण करत होतो. सदर ठिकाणी रस्ता वर गर्दी जमलेली असल्याने शाम यांनी आपल्या चारचाकी जात असताना काय प्रकार सुरू आहे हे पाहण्यासाठी गाडी बाहेर येत विचारपूस केली असता काही समजण्याच्या आत संशयित आरोपी संतोष याने शाम सह इतर दोघा वर चॉपर वार केले. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार संजय शिंदे व अनंता महाले पुढील तपास करीत आहेत.