नाशिक – जुने नाशिक परिसरातील भोई गल्लीत दोघांनी एकावर धारदार शस्त्राने झालेल्या मारहाणीत एक गंभीर
जखमी आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल असून, पोलिसांनी किरण शाम पोरे
उर्फ चिकु (वय २९) राहूल नेवानंद ठाकरे उर्फ अवली (वय २८, भोई गल्ली, जुना कथडा) या दोघा संशयितांना अटक
केली आहे. शुक्रवारी (ता.५) तीनला या दोघांनी धारदार शस्त्राने वार करीत लखन चंद्रकांत काशीद (वय २३) याला
गंभीर जखमी केले आहे. त्यात, लखनच्या बरगड्यावर वार केल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
याप्रकरणी जखमी लखनचा मावस भाऊ किरण ज्ञानेश्वर डांगरे (वय २५, शिंपी गल्ली ) याच्या तक्रारीवरुन दोघां
संशयिताविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी लखन याची प्रकृती गंभीर असून
पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. तर यात संशयित राहूल देविदास ठाकरे यानेही जखमी लखन चंद्रकांत
काशीद याच्या विरोधात तक्रार दिली असून त्यात,शुक्रवारी (ता.५) भोई गल्लीतील देवीमाता मंदीराजवळ दुपारी तीनला
जखमी लखन काशीद याने डाव्या पायाच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार केल्याचे म्हटले आहे.