कॉलेज रोडला डिसुझा कॉलनीत घरफोडी; सोन्या चांदीच्या वस्तू केल्या लंपास
नाशिक – कॉलेज रोडला डिसुझा कॉलीत बंद घरात घरफोडी करीत चोरट्यांनी सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सुप्रतीक प्रताप दत्ता (वय ४५, डिझुसा कॉलनी यांच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी – तक्रारदार सुप्रतिक दत्ता यांचे कॉलेज रोडला डिसुझा कॉलनीत तृप्ती अपार्टमेंटमध्ये अजिंक्य बंगला आहे. ते १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता, चोरट्यांनी रात्रीतून कधी तरी, त्यांच्या बंद बंगल्याच्या पश्चिम बाजूकडील खिडकीचे लोखंडी ग्रील उचकटून बंगल्यात प्रवेश करीत, बेडरुमधील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील चांदीची गोल्ड प्लेटेड चेन, मोत्याचा नेकलेस, १५० ग्रॅम चांदीचा धातूचा बॉक्स, चांदीचे नाणे, चांदीचा पुजेचा निरंजन, चांदीचे ग्लास, लोटी, पुजेचे साहित्यांसह १२ भांड्याचा सेट, २०० ग्रॅमचे चांदीचे ताट, चांदीच्या दोन वाट्या असा ऐवज चोरुन नेला.
अशोक स्तंभावर महिलेची पोत लांबविली
नाशिक – अशोक स्तंभावर घारपुरे घाटावरील उघड्या घरात महिलेची ४० ग्रॅम सोन्याची पोत चोरीचा प्रकार
उघडकीस आला आहे. याप्रकरणी रोहीनी किरण कर्पे (वय ४९,शक्तीप्लाझा अशोकस्तंभ) यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शनिवारी (ता.६) दुपारी पावणे पाचच्या सुमारास चोरट्यांनी तक्रारदार रोहिणी कर्पे यांच्या उघड्या घरात घुसुन त्यांच्या घरातील ४० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरुन नेली.