आय लव यू म्हणणे पडले महागात; विनयभंगाचा गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोतील सावतानगरला मुलीच्या घरासमोर येऊन जोरात आय लव यू असे म्हणत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन अंबड पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सावतानगर परिसरात पीडित मुलगी तिच्या आई-वडीलांसह घरात असतांना संशयिताने तिच्या घरासमोर येऊन जोरात आय लव यू म्हणत विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बस प्रवासात दीड लाखांचे दागिणे लंपास
नाशिक – नाशिक मध्यवर्ती बस प्रवासात गर्दीत महिलेच्या पर्समधील सुमारे दीड लाखांचे दागिणे लंपास केले. याप्रकरणी रंजना रामचंद्र पवार (वय ४४, प्रगतीनगर बोरगड) यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रंजना पवार या शुक्रवारी (ता.५) नाशिक नंदुरबार बस प्रवास करीत असतांना चोरट्याने त्यांच्या पर्सची चेन उघडून त्यांच्या पर्समधील ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, १५ ग्रॅमच्या सोन्याच्या मंगळसूत्र अशा सुमारे दीड लाखांच्या दागिण्याची चोरी केली.
शहरात तीन दुचाकीची चोरी
नाशिक – दामोदर चित्रपटगृहाजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी रमाकांत रामचंद्र चव्हाण (वय ५७, होलाराम कॉलनी, कस्तुरबा नगर) यांच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी रमाकांत चव्हाण यांनी त्यांची दुचाकी ॲक्टीव्हा (एमएच १५ ईवाय ७६२५) गुरुवारी (ता.४) नोव्हेंबरला दामोदर चित्रपटगृहा शेजारील महाकृष्ण रेस्टॉरन्ट शेजारी रस्त्याच्या कडेला पार्किंग केली असता, चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली. दुसऱ्या घटनेत लालचंद मेघराज नंदवानी (वय ६१, सत्यम अर्पाटमेंट वसंत मार्केट समोर कॅनडा कॉर्नर) यांनी त्यांची वंसत मार्केट समोरील घराच्या पार्कींगमध्ये लावलेली त्यांची दुचाकी ॲक्टीव्हा (एमएच १५ एफई ५४४५) चोरट्याने चोरुन नेली. तिसऱ्या घटनेत गोपाळकृष्ण ईश्वरलाल चौधरी (वय ३१, सराफ नगर, क्लासीक वरद अर्पाटमेंट) यांची दुचाकी हिरो होंडा पॅशन (एमएच ४२ पी १४२२) हि बुधवारी (ता.४) गुरु गोविंद सिंह कॉलेज जवळील सराफनगर येथून चोरुन नेली.