हिरावाडीत दोन लाखांचे दागिणे लंपास; पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक – पंचवटीतील हिरावाडीत शुक्रवारी (ता.५) चोरट्यांनी घरातील सुमारे दोन लाखांचे दागिणे लंपास केले. याप्रकरणी सुरेश बाबूराव
दामोदरे यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी सुरेश बाबूराव दामोदरे यांचे कुटुंबातील सगळे सदस्य गुरुवारी सकाळी घरात झोपत असतांना त्यांच्या भगीनी रंजना हरिष अंबरे हे दार उघडे ठेउन लिंबू विक्रीला गेल्या असतांना या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करीत, लक्ष्मीपूजनाला घऱाच्या शोकेसवर काढून ठेवलेले चार ग्रॅमच्या सोन्याच्या वाट्या मंगळसूत्र, अडीच तोळ्याचे सोन्याची पोत, सोन्याचे पेंडल असा सुमारे दोन लाखांहून आधीकचा सोन्या चांदीचा ऐवज चोरुन नेला. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी टाकळीला बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचा ऐवज चोरुन नेला.
आगरटाकळी चाळीस हजाराचा ऐवज लंपास
नाशिक – जालना येथे गावाकडे गेलेल्या कुटुंबातील घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी चाळीस हजाराचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी स्वप्नमाला संदीप मुंडे ( समतानगर, आगरटाकळी ) यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंडे कुटुंबिय २४ आॅक्टोबरला जालना येथे गावाकडे गेले होते शुक्रवारी (ता.५) पून्हा आगरटाकळी येथे परत आले तेव्हा त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरातील ४ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, साडे तीन ग्रॅम वजनाची कर्णफुल, पायातील चांदीच्या पट्या, भारत गॅस कंपनीचे दोन सिलेंडर असा सुमारे चाळीस हजाराचा ऐवज चोरुन नेल्याचे उघडकीस आले.