नाशिक – इंदिरानगर परिसरातील साईनाथनगर येथील जनार्दनवाडी परिसरात पाच सहा जणांनी जुन्या भांडणाच्या वादातून एकावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मनोज चव्हाणके यांच्या तक्रारीवरुन रविंद्र भाउराव पगार (वय ५०) सोहम रविंद्र पगार (वय २१, कुणाल अर्पाटमेंट, जनार्दनवाडी, साईनाथनगर इंदिरानगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर श्रीजय विजय निफाडे, आश्विनी पगार, सत्यम पगार, विजय मनोहर निफाडे हे फरार आहे. मनोज साहेबराव चव्हाणके (वय ३०, ) यांच्या तक्रारीवरुन इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शुक्रवारी (ता.५) साडे बाराच्या सुमारास संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मागील भांडणाची कुरापत काढून चव्हाणके यांच्या वडीलांना धक्का मारला त्यानंतर शिवीगाळ सुरु असतांना जयेश कलकर हा सोडवायला गेला असता त्याच्या हातावर कोयत्याने वार केले तर एकाने तक्रारदार मनोज यांच्या डोक्यात फरशी मारुन जखमी केले. तर इतरांनी कोयते काढून परिसरात दहशत केली. तर रविंद्र भाउराव पगार (वय ५०, ) यांच्या तक्रारीनुसार, ३ नोव्हेंबरला झालेल्या जुन्या वादातून मनोज चव्हाणके, साहेबराव चव्हाणके, चैताली चव्हाणके, सुरेखा शाह, योगेश रेवगडे, जयेश कलनकर आदीनी शुक्रवारी (ता.५) साडे बाराच्या सुमारास कुणाल अपार्टमेंच्या पार्किंगमध्ये गैरकायद्याची मंडळी जमवून लाठ्या काठ्या कोयते घेउन शिवीगाळ करीत लाथा बुक्यांनी मारहाण केली.