नाशिक – फटाके फोडण्यावरुन देवळाली कॅम्पमध्ये एकाला बेदम मारहाण; चार जणांना अटक
नाशिक – देवळाली कॅम्पला हाडोळा भागात गुरुवारी रात्री एकाला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सनी रमेश भोळे (वय २३, डॉ. आंबेडकर हौसींग सोसायटी) यांच्या तक्रारीवरुन देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी सनी काळे हा गुरुवारी (ता.४) रात्री अकराला त्याच्या काळे चौकात फटाके वाजवत असतांना दिपक चिंतामन भालेराव (वय २१), यश उर्फ बंटी तानाजी जगताप (वय २६, ) रोहीत आनंदा काळे (वय २३) प्रेम राजेंद्र गांगुर्डे (वय ३२), सुशील उर्फ बल्या मोरे आदीनी धारदार शस्त्राने वार करीत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, सुशील मोरे फरारी आहे.
फटाके फोडण्यावरुन वाद; सुंदरनगरला दोघांनी मुलीच्या वडील व भावावर वार केले
नाशिक – मुलीजवळ फटाके का फोडतो याचा जाब विचारल्यावरुन सुंदरनगरला दोघांनी मुलीच्या वडील व भावावर वार केले तसेच त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. लक्ष्मण कुमावत व नीलेश कुमावत सुंदरनगर देवळालीगाव अशी संशयितांची नावे आहे. बुधवारी (ता.४) रात्री सव्वा नउला संशयित लक्ष्मण व निलेश कुमावत यांनी तक्रारदार राजेंद्र ढोले यांच्या मुलीच्या जवळ फटाका फोडला त्याविषयी ढोले हे दोघांना समजून सांगायला गेले असता, दोघांनी शिवीगाळ करीत लक्ष्मण कुमावत याने धारदार कटरने त्यांच्या उजव्या गालावर वार केले. तसेच त्यांचा मुलगा प्रथमेश याच्या गालावर वार केले. त्यानंतर त्यांच्या घरासमोर उभी असलेली ॲपे गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर तपास करीत आहे.