नाशिक : पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत शरिरसुखाची मागणी केल्याने विवाहीतेने आत्महत्या केल्याची घटना तुळजाभवानी नगर भागात घडली. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून एका विरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्ड तपासल्याने हा प्रकार समोर आला आहे. रूदवी (नाव गाव पूर्ण नाही) असे संशयीताचे नाव आहे. शरदचंद्र पवार मार्केट मागील तुळजा भवानीनगर भागात राहणा-या विवाहीतेने नुकतीच आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. मृत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत सन.२०१५ ते २६ जून २०२१ दरम्यान महिलेच्या संपर्कात होता. ७४१४९५४४६२ या क्रमांकावरून तो महिलेशी संपर्क साधून शरिरसुखाची मागणी करीत होता. याकाळात त्याने पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलच्या माध्यमातून तो तिचा मानसिक व शारिरीक छळ करीत होता. त्यातून तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डंबाळे करीत आहेत.