नाशिक : गुंतवणुक अल्पावधीत दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून दांम्पत्याने एका महिलेस सहा लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र पंडीत दराडे आणि मनिषा रविंद्र दराडे (रा.बिझनेस कोर्ट बिल्डींग,गोविंदनगर) असे ठकबाज दांम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी ललिता गणेश सोनवणे (रा.महारूद्र कॉलनी,चार्वाक चौक) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयीतांनी गोविंदनगर येथील बिझनेस कोर्ट बिल्डींग येथे आर. डी .ट्रेंडिग सोल्युशन नावाने कार्यालय थाटून अनेकांना गंडा घातला आहे. सोनवणे यांना भामट्यांनी १७ मार्च ते १२ नोव्हेंबर दरम्यान दहा महिन्यात गुंतवणुकीवर दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून ६ लाख २ हजार ५०० रूपये आपल्या कंपनीत गुंतवणुक करण्यास भाग पाडले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक साजिद मन्सुरी करीत आहेत.