नाशिक : दिवाळीची खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या पर्स मधील पाकिट हातोहात लांबविल्याची घटना कानडे मारूती लेन भागात घडली. या पाकिटात सोने चांदीचे दागिणे व हिरा असा सुमारे ७५ हजार रूपये किमतीचा ऐवज होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता अरविंद कानडे (रा.समर्थ नगर,मेरी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अनिता कानडे या मंगळवारी (दि.२) दिवाळीच्या खरेदीसाठी भद्रकाली परिसरात आल्या होत्या. कानडे मारूती लेन परिसरातील इशिता कलेक्शन समोर त्या खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधून भामट्यांनी त्यांच्या पर्स मधील पाकिट चोरून नेले. पाकिटात सोन्याचांदीचे दागिणे आणि हिºयाचा खडा असा सुमारे ७५ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास पोलीस नाईक बैरागी करीत आहेत.