नाशिक – औद्योगीक वसाहतीतील कारखान्यातून ५० हजार रूपये किमतीची कॉपर वायर चोरीला
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील कारखान्यातून चोरट्यांनी कॉपर वायर चोरून नेल्याची घटना शारदा मोटर्स कंपनीत घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत दत्तात्रेय कुलथे (रा.श्यामसुंदर अपा.पाथर्डी फाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुलथे शारदा मोटार कारखान्यात कार्यरत असून,ही घटना बुधवारी (दि.३) घडली. अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या मेटेनन्स डिपार्टमेंट मध्ये प्रवेश करून सुमारे ५० हजार रूपये किमतीची कॉपर वायर चोरून नेली. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
घरफोडीत चोरट्यांचा ५५ हजार रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला
नाशिक : जेलरोड भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ५५ हजार रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश पांडूरंग सोनवणे (रा.मराठा नगर,राजराजेश्वरी मंगल कार्यालयामागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे कुटूंबिय २० ते २० आॅक्टोबर दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून ही चोरी केली. घरात घुसलेल्या भामट््यांनी बेडरूममधील लाकडी कपाटातून ३० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५५ हजार ४०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.