नाशिक : इंग्लड विरूध्द श्रीलंका या टि २० या क्रिकेट वर्ल्डकपमधील सामन्यावर सट्टा खेळणा-याला शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने गजाआड केले आहे. त्याच्याकडून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे ७६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपील जगन्नाथ देशमुख (रा.गणेशनगर,काठेगल्ली) असे संशयीत जुगारीचे नाव आहे.
शुक्रवारी (दि.१) इंग्लड विरूध्द श्रीलंका सामना रंगला होता. या सामन्यावर संशयीत सट्टा खेळवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा लावला असता संशयीत पोलीसांच्या जाळयात अडकला. संशयीत त्याच्या राहत्या श्रीकृष्ण अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये जुगार खेळवितांना मिळवून आला. देशमुख हा साथीदार शाम रघुवंशी (रा.इंदिरानगर) याच्याकडून आयडी पासवर्ड घेवून सट्टा खेळणा-या इसमांकडून रोख रूपये घेवून त्यांना सट्टा खेळवितांना मिळून आला. मोबाईलवरील थेट प्रेक्षपणावर सट्याच्या भावाबाबत जुगारींना माहिती कळवून संबधीतांचे पैसे लावून जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आला. संशयीताच्या ताब्यातून चार मोबाईल,जुगाराचे साहित्य आणि रोकड असा सुमारे ७६ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून त्यास भद्रकाली पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिनेश खैरणार,उपनिरीक्षक विष्णू उगले,जमादार रविंद्र बागुल,नाझिम पठाण,दिलीप मोंढे,फैय्याज सय्यद,आसिफ तांबोळी,विशाल देवरे,प्रतिभा पोखरकर आदींच्या पथकाने केली.