पिस्तूलधारी चौकडी जेरबंद
नाशिक : पिस्तूल घेऊन कारमध्ये फिरणा-या चौकडीस पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संशयीत पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या ताब्यातून कारसह चार पिस्तूल आणि काडतुसे असा सुमारे २१ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल संदीप सोनार (२९ रा.स्वप्निल सोसा.जयभवानीरोड),सागर किसन कोकणे (२१ रा.निवारा दर्शन,हनुमान चौक चेहडी पंपीगरोड),दर्शन उत्तम दोंदे (२३ डॉ.आांबेडकर पुतळयाजवळ राजवाडा कामटवाडा) व प्रशांत नानासाहेब जाधव (२४ रा.केश्व लक्ष्मी अपा.जाधवमळा,दे.गाव) अशी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयीताची नावे आहेत.युनिट १चे कर्मचारी राहूल पालखेडे यांनी तक्रार दाखल केली आहे. जयभवानी रोडवरील फर्नांडीसवाडी भागात मंगळवारी रात्री कारमधून पिस्तूलधारी तरूण येणार असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शानाखाली सापळा लावण्यात आला होता. स्वप्निल बिल्डींग परिसरात पोलीसांनी एमएच १५ सीएच ९३९२ ही फॉर्च्युनर कार अडवून तपासणी केली असता कारमधील गुन्हेगार असलेल्या संशयीतांकडे विनापरवाना चार गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे मिळून आले.अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.
….