नाशिक : औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाख रूपये किंमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश दिनकर टिळे (३३ रा.शुभम अपा.गणेश मंदिर,शिवाजी नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. टिळे कुटुंबिय शनिवारी (दि.३०) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून हॉलमधील कपाटातून पाच हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख २७ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.