मित्रासमवेत कामावर जात असतांना धावत्या दुचाकीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यु
नाशिक : मित्रासमवेत कामावर जात असतांना धावत्या दुचाकीवरून पडल्याने ३६ वर्षीय कारखाना कामगाराचा मृत्यु झाला. हा अपघात औद्योगीक वसाहतीतील कार्बन नाका भागात झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
प्रशांत वसंत मोरे (रा.कर्मा बिल्डींग,नागरे मळा) असे दुचाकीवरून पडल्याने मृत्यु झालेल्या इसमाचे नाव आहे. मोरे रविवारी (दि.३१) सकाळी आपल्या मित्राच्या दुचाकीवर डबलसिट कारखान्यात कामावर जात असतांना हा अपघात झाला. कार्बन नाका परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ अचानक धावत्या दुचाकीवरून ते तोल जावून पडले. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यांना मुंबईनाका भागातील सुविधा हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक सुर्यवंशी करीत आहेत.
निलगिरी बागेत युवकाची आत्महत्या
नाशिक : निलगिरीबाग भागात राहणा-या २९ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पवन युवराज इप्परदास (रा.निलगीरीबाग,औरंगाबाद रोड) असे आत्महत्या करणा-या तरूणाचे नाव आहे. इप्परदास याने रविवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्यास पट्याच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.