चांदीचा मार; पावने दोन लाख रुपये देण्यास नकार दिल्यामुळे फसवणूकीचा गुन्हा दाखल
नाशिक – सव्वा तीन लाखांची चांदी घेउन त्यातील पावने दोन लाख रुपये देण्यास नकार देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मयुर राजमल पाटील पर्ल पार्क एक्सलो पाईंट ) असे संशयिताचे नाव आहे. योगेश रविंद्र अष्टेकर यांच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी – संशयित मयुर पाटील याने सराफ योगेश अष्टेकर यांच्याकडून दीड लाख रुपये रोख भरुन जून महिन्यात ११००७ ग्रॅम चांदी खरेदी केली होती. राहिलेले पावने दोन लाख रुपये नंतर देण्याच्या बोलीवर झालेल्या या व्यवहारात जुलै महिन्यात जेव्हा पैसे मागितले तेव्हा पैसे देऊ शकत नाही असा मेसेज करीत संशयिताने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारदाराने न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार भद्रकाली पोलिस ठण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
उंटवाडीत दुचाकी चोरी
नाशिक – अंबड लिंक रोड वर खुटवडनगरला दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. सतीष गोपाळकृष्ण नायर (वय ४१, वावरे नगर) यांच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार सतीष नायर यांनी १३ आॅक्टोबरला बाराला त्यांची दुचाकी ॲक्टीव्हा (एमएच १५ सीव्ही २६०) सीटी सेंटर मॉल पाठीमगील रस्त्या लगत हॅंडल लॉक करुन पार्क केली असता, चोरट्याने दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.