नाशिक – सुयश हॉस्पीटलमध्ये जुलैपासून चार महिने सिटी स्कॅन व्यवहारात आफरातफर करीत दोघांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला सुमारे १७ लाखाला गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी योगेश कचरु खकाळे व ज्ञानेश्वर उर्फ जय भारुड तपोवन पंचवटी यांच्या विरोधात सुयश हॉस्पीटलतर्फे डॉ. गौरव राजेंद्रकुमार खैरनार (वय ३३, ओपेल इन्क्लेव्ह कर्मयोगीनगर तिडके कॉलनी) मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी – संशयित योगेश खकाळे आणि जय भारुड या दोघा संशयितांनी सुयश हॉस्पीटल प्रशासन किंवा तक्रारदार डॉ. खैरनार यांची परवानगी न घेता, एप्रिल महिन्यात २०३ रुग्णांच्या सीटी स्कॅन रेकॉर्ड दाखविले नाही. मे महिन्यात १७९ पैकी १५९ रुग्णांचेच सीटी स्कॅन नोंदी दाखविल्या. यासह जुलै ते ॲक्टोबर दरम्यान सुमारे १७ लाख १९ हजाराला गंडविल्याचे पुढे आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक साजिद मन्सुरी तपास करीत आहे.