अशोकनगरला महिलेचा विनयभंग; सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक – सातपूरला अशोकनगर परिसरात महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. नवनाथ जाधव (वय ३८, राजमुद्रा सोसायटी) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेच्या तक्रारी वरुन सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी संशयिताने चार दिवसांपूर्वी २७ तारखेला रात्री पावने दहाच्या सुमारास पीडित महिलेचा हात धरुन जवळ ओढून विनयभंग केला. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी संशियताला अटक केली आहे.
मोरवाडीत एकाकडून कट्टा हस्तगत
नाशिक – सिडकोत मोरवाडी भागातील पंडीतनगर येथील मार्केट जवळ पोलिसांनी एका कडून गावठी कट्यासह दोन जिवंत काडतूस हस्तगत केले . याप्रकरणी पोलिस नाईक विजय वरंदळ यांच्या तक्रारीवरुन तेजपालपन्नालाल शर्मा, (पंडीतनगर मोरवाडी सिडको) याला पोलिसांनी अटक केली आहे. काल शनिवारी (ता.३०) सायंकाळी पाचला संशयित तेजपाल हा फरार असलेल्या निरज भगेल करसुवा अलिगड उत्तरप्रदेश यांच्याकडून घेतलेला कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहीती मिळाल्यावरुन पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून पितळी बॉडीटचा लोखंडी बॅरेल २ जिवंत काडतूस असा ऐवज हस्तगत केला.