अंबडला बेकायदा दारू विक्री; पोलीसांची चाहूल लागताच विक्रेता फरार
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील एमएसईबी सबस्टेशन आवारात बेकायदा मद्यविक्रीचा प्रकार समोर आला आहे. पोलीसांची चाहूल लागताच विक्रेता देशी विदेशी दारू साठा सोडून पसार झाला असून याकारवाईत ५७ हजार २८० रुपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. विशाल रामभाऊ कदम (रा.घरकुल,अंबड) असे संशयीत बेकायदा मद्यविक्री करणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अमीर शेख यांनी तक्रार दाखल केली आहे. अंबड गावानजीकच्या महावितरण सबस्टेशन भागात बेकायदा मद्यविक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२९) रात्री पोलीसांनी सापळा लावला असता बेकायदा मद्यसाठा पोलीसांच्या हाती लागला. संशयीत मोकळ््या जागेतील एका टपरीच्या आडोशाला मद्यविक्री करीत होता. मात्र पोलीसांची चाहूल लागताच तो अंधाराचा फायदा उचलत मुद्देमाल सोडून पसार झाला असून याकारवाईत ५७ हजार २८० रुपए किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
फिनेल सेवन करून एकाची आत्महत्या
नाशिक : फिनेल सेवन करून ६० वर्षीय वृध्दाने आत्महत्या केल्याची घटना जुने नाशिक भागात घडली. वृध्दाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. भगीरथ त्र्यंबक आमले (रा.जुनी काझीगढी,अमरधामरोड) असे आत्महत्या करणा-या वृध्दाचे नाव आहे. आमले यांनी शुक्रवारी (दि.२९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी फिनेलचे अतीसेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ कॉलेजरोड भागातील लिलावती रूग्णालयात हलविले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक म्हसदे करीत आहेत.