विवाहीतेची आत्महत्या सासरच्या मंडळीवर गुन्हा
नाशिक : चारित्र्याच्या संशयासह पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी माहेरून ५० हजार रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहीतेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल कु-हाडे, नाना कु-हाडे, सवडूबाई कु-हाडे,अनिल कु-हाडे,चंद्रकला गायकवाड ,शाकिला शिंदे (रा.जनार्दनस्वामी नगर,नांदूरनाका) अशी संशयीतांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिणी कु-हाडे या २४ वर्षीय विवाहीतेने मंगळवारी (दि.११) आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारीत लग्नानंतर सासरच्या मंडळीने किरकोळ कारणातून मानसिक व शाारिरीक छळ केल्याचे म्हटले आहे. तसेच चारित्र्याच्या संशयासह पोल्ट्री फॉर्म टाकण्यासाठी माहेरून ५० हजार रूपये आणावेत या मागणीवरून मारहाणीत तिचा दोन वेळा गर्भपात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बिडकर करीत आहेत.
…..