नाशिक : कोर्टात दिलेल्या साक्षी जबाबावरून एकाने तरूणीची वाट अडवित अश्लिल शिवीगाळ करीत धमकी दिल्याची घटना दिंडोरीरोड भागात घडली.याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेश सुनिल सारवान (रा.मेरी कॉलनी,पंचवटी) असे संशयीताचे नाव असून तो एका बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधीत अधिनियम तथा पोस्को आाणि विनयभंगाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी आहे. या प्रकरणात पोकार कॉलनी भागात राहणारी १९ वर्षीय तरूणी साक्षीदार आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास ती पोकार कॉलनीतील पोकार गार्डन अपार्टमेंट समोरून पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या संशयीताने तिची वाट अडविली. यावेळी संतप्त तरूणाने अश्लिल शिावीगाळ करीत युवतीस तू जी माझ्या विरूध्द कोर्टात साक्ष दिली. ती चुकीची होती. पुढील तारखेस मी सांगेल तिच साक्ष दे नाही तर तुला बघून घेईल अशी धमकी व दमदाटी केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास हवालदार रानडे करीत आहेत.