नाशिक : उघड्या घरात शिरून चोरट्यांनी पलंगामधील कापडी पिशवीत ठेवलेल्या रोकडसह सुमारे दोन लाख रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दाागिणे चोरून नेल्याची घटना जुने नाशिक भागातील काझीगडी भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिता दत्तू मोंढे (रा.किशोर किराणा दुकान,काझीगढी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मोंढे कुटूबिय मंगळवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून हॉलमधील लाकडी पलंगाच्या बॉक्स मध्ये ठेवलेली कापडी पिशवी चोरून नेली. पिशवीत दीड लाखाची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ९५ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.