नाशिक – श्रमिक नगर येथील पाझर तलावात शाळेतील विद्यार्थी मुदतफिर मकरानी (वय १७वर्षे) याचा बुडून संशयास्पद रित्या मृत्यू झाला आहे. मकरानीचा त्यांच्या मित्राबरोबर वाद झाला होता. त्यानंतर तो तलावा जवळ गेला. त्यानंतर ही घटना दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. त्यानंतर त्यांनी पाहणी केली. त्यानंतर या घटनेची चौकशी सुरु केली. नेमका वाद काय होता. वाद कशामुळे झाला. नेमकं बुडण्याची पार्श्वभूमी काय याबाबत पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहेत.