नाशिक : पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी पाच लाख रूपये असलेली बॅग हातोहात लांबविल्याची घटना कालिका नगर भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष पुरूषोत्तम पटेल (रा.जगतापनगर,उंटवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पटेल मंगळवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास कालीका नगर येथील गजानन कॉलनी भागात गेले होते. त्रिकोणी बंगला परिसरातील साधना रो हाऊस समोर त्यांनी आपली एक्स युव्ही एमएच १५ डिएस ५५२५ पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेल्या कारची काच फोडून चालक आसना शेजारी ठेवलेली बॅग चोरून नेली. या बॅगेत पाच लाखाची रोकड व महत्वाची तसेच बांधकामाची कागदपत्र होती. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.