नाशिक : चंदन तस्कर पुन्हा सर्कीय झाले असून सरकारी बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड भामट्यांनी कापून नेले. ही घटना विभागीय महसूल आयुक्तांच्या बंगला आवारात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल गांगुर्डे (रा.उंटवाडी) या पोलीस कर्मचाºयाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गांगुर्डे हे विभागीय महसूल आयुक्त यांच्या बंगल्यात नेमणुकीस असून सोमवारी (दि.२५) अज्ञात चोरट्यांनी कडेकोट बंदोबस्त असलेल्या बंगल्याच्या आवारात प्रवेश करून २ ते ३ वर्षाचे झाड कापून नेले. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.