वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दोघा बहिणींना तीघांनी बेदम मारहाण
नाशिक : घरासमोर असलेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दोघा बहिणींना तीघांनी बेदम मारहाण केल्याची घटना आगरटाकळी येथील वैदूवाडीत घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर गुरू लोखंडे,सविता शंकर लोखंडे व साजन गुरू लोखंडे (रा.सर्व वैदूवाडी,आगरटाकळी) अशी दोघा बहिणींना मारहाण करणाºया संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी लता लक्ष्मण शिंदे (रा.वैदूवाडी) या महिलेने तक्रार दाखल केली आहे. रविवारी (दि.२४) रात्री ही घटना घडली. शिंदे यांच्या घरासमोर संशयीत एका माणसास मारहाण करीत होते. यावेळी शिंदे व त्यांच्या बहिणीने मध्यस्थी करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता संशयीतांनी शिवीगाळ करीत दोघा बहिणींना लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुन्तोडे करीत आहेत.
………
महिलेची गळफास लावून आत्महत्या
नाशिक : जयभवानी रोड भागात राहणा-या ३० वर्षीय महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोद करण्यात आली आहे. कविता सचिन क्षेत्रीय (रा.लवटेनगर,जयभवानीरोड) असे आत्महत्या करणाºया महिलेचे नाव आहे. कविता क्षेत्रीय या महिलेने रविवारी (दि.२४) रात्री आपल्या राहत्या घरातील पख्यास ओढणी बाधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती सचिन क्षेत्रीय यांनी तिला तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार काझी करीत आहेत.
……..