रिक्षातील गाण्याचा आवाज करण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात चाकुने वार
नाशिक, – रिक्षातील गाण्याचा आवाज कमी करण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात एकावर चाकुचे वार करण्यात आले ही घटना औरगाबाद मार्गावरील विडी कामगार वसाहतीत घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पांडुरंग हांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत ज्ञानेश्वर यशवंत जाधव, (वय २६, बिडी कामगार नगर ) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी विडी कामगार वसाहतीत स्वामी समर्थ केंद्राजवळ शुक्रवारी (दि.२२) रात्री साडे दहाला भारत पांडूरंग हांडे याने रिक्षातील गाण्याचा आवाज कमी करण्याचा कारणावरुन तक्रारदार ज्ञानेश्वर जाधव याच्याशी वाद घातला यावेळी शिवीगाळ करीत हातातील धारदार शस्त्राने त्याच्या उजव्या पायाच्या मांडीवर वार केला. तसेच माझ्या नादी लागला तर मी तुला सोडणार नाही असा दम देत रिक्षासह पळून गेला. आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस नाईक जाधव तपास करीत आहेत.
…
दुचाकी चोरीला
नाशिक – नाशिक पुणे महामार्गावरील सेलिब्रेटा हॉटेल समोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी भुपेंद्र पांडूरंग चौधरी (वय ४५, शिवशक्ती चौक सिडको) यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी भुपेंद्र चौधरी यांनी त्याची दुचाकी हिरो होंडा (एमएच १५ डीपी ४१९७) सेलीब्रेटा हॉटेल समोर हॅण्डल लॉक करुन पार्क केली असता, चोरट्यांनी चोरुन नेल्याचे शनिवारी उघडकीस आले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.