नाशिक – स्वस्तात मर्सिडीज कार देण्याच्या बहाण्याने सुमारे सव्वा तीन लाखाला गंडा
नाशिक – स्वस्तात मर्सिडीज कार देण्याच्या बहाण्याने सुमारे सव्वा तीन लाखाला फसविल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणा विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विजय अर्जुन पाटील (वय ४६, महात्मानगर) यांच्या तक्रारीवरुन अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी कार्टे (सातवे) यांच्या आदेशानुसार मर्सिडीज बेन्ज इंडियाचे चाकण – निघोज प्लॅटचे व्यवस्थापक, हा गुन्हा दाखल झाला आहे. ओम मोहरीरचे संचालक, संदीप चंचलानी, सागर थोरे, महात्मानगर येथील येस. बॅकेचे आदित्य कर्रा यांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी ५ ऑगस्ट २०१६ ते २२ जुलै २०१९ दरम्यान संशयितानी संगनमताने मर्सिडीज बेंन्ज जीएल २०० ही कार बाजारभावापेक्षा कमी किमतीत
देतो असे सांगून तक्रारदार पाटील यांना आमीष दाखवून त्यांना येस बॅकेत पाठवून त्यांच्या नावाने कर्ज मंजूर करुन त्यांचा दरमहा
हप्ता सुरु केला तसेच कर्ज बंद करण्यासाठी येस बॅकेने ३ लाख २३ हजार ६४४ रुपये साडे सात हजार रुपये प्रोसेसिंग फि घेउन
फसवणूक केली त्या बदल्यात संशयितांनी तक्रारदाराला कुठलीही गाडी दिली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी न्यायालयात तक्रार केली
असता, न्यायालयाच्या आदेशाने अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक नंदन बगाडे तपास करीत आहेत.
अवैध दारु विक्री, गुन्हा दाखल
नाशिक – पेठ रोड मार्गावरली तलवी फाटा येथे अवैध दारु विक्रीवरुन पोलिसांनी ललीत सापटे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तवली पाठा येथील लक्ष्मणनगर येथील मोकळ्या मैदानात संशयित ललीत सापटे हादारु विक्री करीत असल्याची माहीती मिळाल्यावरुन पोलिस शिपाई जितेंद्र देविदास शिंदे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी छापा टाकला असता, संशयित ६६० प्रिन्स संत्राच्या देसी दारुच्या बाटल्या तशाच टाकून पळून गेला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस.बी.पवार तपास करीत आहेत
दुकानासमोर लावलेली दुचाकी पेटवली
नाशिक – जेल रोडला कृष्णा ग्राफीक्स दुकानासमोर लावलेली दुचाकी एकाने पेटवून दिली. पराग उर्फ गोटू राजू गायधनी असे
संशयिताचे नाव असून त्याच्या विरोधात सैलानीबाबा येथील ओमनगर परिसरातील कृष्णा नागोराव इंगळे (वय २२, ओमनगर सौलानीबाबा) यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी जेल रोडला पुरुषोत्तम शाळेजवळ गायधनी निवास परिसरात कृष्णा ग्राफीक्स दुकानासमोर तक्रारदार कृष्णा इंगळे यांनी त्यांची मारुती सुझुकी आरएक्स हंण्ड्रेड (एमएच ०३ए ४६३९) लावली असतांना संशयित पराग याने शुक्रवारी (ता.२२) रात्री साडे अकराला पेटवून दिली त्यात, दुचाकीची डिक्की, सीट, हेडलॅम्प, इंजिन जळून नुकसान केले.