लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार
नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरूणीवर एकाने बळजबरीने वारंवार बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीताने मुलीस मारहाण करीत तिच्या कुटूंबियांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. गिरीष विजय महाजन (२९ रा.सिध्दार्थ नगर,जेलरोड) असे संशयीताचे नाव आहे. २४ वर्षीय तरूणीशी गिरीश महाजन याचे प्रेमसंबध होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने वेगवेगळया भागात घेवून जात तीच्यावर वारंवार बलात्कार केला. हा प्रकार गेल्या वर्ष भरापासून सुरू होता. मुलीने लग्नासाठी तगादा लावला असता त्याने मारहाण करीत तिच्या कुटूंबियांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.
…..
निफाडचा तडीपार जेरबंद
नाशिक : जिल्ह्यातून हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ कारभारी सानप (३० रा.शिवरेफाटा,निफाड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. संशयीताच्या गुन्हेगारी कारवायामुळे त्यास निफाड उपविभागीय अधिका-यांच्या आदेशान्वये एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली होती. सोमवारी (दि.११) संशयीत औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी सापळा लावला होता. शंकर मंदिर परिसरात संशयीत येताच पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. युनिट १ टे कर्मचारी प्रविण चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांस गंगापूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. अधिक तपास हवालदार भुमकर करीत आहेत.
…..
लाखलगावला तरूणाची आत्महत्या
नाशिक : लाखलगाव ता.जि.नाशिक येथील २८ वर्षीय तरूणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मुकूंद काशिनाथ कानडे असे मृत तरूणाचे नाव आहे. मुकूंद कानडे याने गेल्या बुधवारी (दि.५) आपल्या राहत्या घरी तणनाशक विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ पंचवटीतील आयुष हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. मंगळवारी (दि.११) उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
……