घरासमोर पार्क केलेली इरटीका कार चोरीला
नाशिक – घरासमोर पार्क केलेली इरटीका कार चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना जेल रोड येथील ठाकरे मळा भागात घडली.याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान रामकृष्ण उगले (वय ६१, श्रीरामनगर ठाकरे मळा, जेल रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी दिलेली माहीती अशी सोपान उगले यांचे श्रीरामनगर येथे उमाज्योत हे रो हाउस आहे. त्यांची इरटिका (एमएच १५ जीएफ ८३४) ही चारचाकी गुरुवारी (ता.२१) रात्री पार्क केली असता, चोरट्यांनी चार चाकी इरर्टिका चोरुन नेली.
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबडले
नाशिक – पती समवेत रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना आयटीआय अंबड लिंक रोड वरील खुटवडनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी सुनिल बच्छाव (वय ३६, रामयाण संकूल, सुखकर्ता हॉस्पीटलसमोर खुटवडनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती शुभांगी या त्यांचे पती सुनील बच्छाव यांच्यासोबत ९ सप्टेंबरला रात्री पावने नऊच्या सुमारास आयटीआय लिंक रोड वरील
दक्षीणमुखी हनुमान मंदीराशेजारील स्वगुण क्लासेस येथून खुटवडनगरला पायी येत असतांना काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या
भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन व बेनटेस्कचे मंगळसूत्र ओरबडून नेले. पोलीस उपनिरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत.
विवाहीतेचा मानसिक व शारीरिक छळ; गुन्हा दाखल
नाशिक – व्यवसायासाठी माहेरुन ३५ लाख रुपये आणावे या मागणी साठी विवाहीतेचा मानसिक व शारीरिक छळ केल्या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विवाहितेच्या तक्रारीनुसार, पती विशाल दिवाणचंद आहुजा, सासू कांचन आहुजा, व दीप दिनेश यांनी १४ फेब्रूवारी २०१७ ला विवाह झाल्यापासून वेळोवेळी माहेरुन ३५ लाख रुपये घेउन यावेतयासाठी शारीरीक व मानसीक छळ करुन स्त्रीधन बळजबरीने काढून घेत मारहाण करीत शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक खडके तपास करीत आहेत.