वैद्यकिय ज्ञान नसतांना घरगुती उपचार; मुलीचा मृत्यू, पित्याविरोधात गुन्हा दाखल
नाशिक – वैद्यकिय ज्ञान नसतांना मुलीवर घरगुती उपचार करुन तिच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलीच्या पित्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत भारत शेटे (वय ३५, शिवगणेश अपार्टमेंट विठ्ठल रुक्मीणी मंगल कार्यालय मखमलाबाद रोड) असे संशयित पित्याचे नाव आहे. त्यांनी घरच्या घऱीच रिया (वय १४) या स्वताच्या मुलीवर पुरेसे वैद्यकिय ज्ञान नसतांना उपचार केले. पोलिसांनी दिलेली माहीती अशी पंचवटीतील मखमलाबाद रोड येथील शिवगणेश अपार्टमेंटमध्ये सौ. अलका व हेमंत भारत शेटे हे मुलगी रिया हिच्यासह रहायला आहे. काही दिवसांपासून त्यांची मुलगी रिया आजारी असल्याने तिच्यावर वैद्यकिय उपचार सुरु होते. थोडे बरे वाटल्यावर मुलीला घरी आणल्यानंतर पून्हा तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिचे वडील हेमंत यांनी गुरुवारी (ता.२१) दुपारी एकला घरच्या घरी सलाईन व त्यात इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यु झाला असा संशयिताची पत्नी व मुलीची आई अलका शेटे याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पी.ए.नेमाने तपास करीत आहे.
…
मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी ७० हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक – भद्रकालीत भाजी पटांगण परिसरात मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी ७० हजाराचा ऐवज लांबविला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन सतीश राठोड (वय ३८, भद्रकाली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी राठोड यांचे भद्रकालीत कोंडाजी दुकाना शोजारी श्रनय मोबाईल शॉपी हे दुकान आहे. गुरुवारी (दि.२१) रात्रीतून चोरट्यांनी बंद दुकानाचे मुख्य दरवाजाचे कुलुप कशाच्या तरी सहाय्याने तोडून दुकानात
प्रवेश करीत चोरट्यांनी दुकानातील ब्लु ट्युथ, जुने मोबाईल, पॉवर बॅक अप, हेडफोन, सीसीटीव्ही असा सुमारे ७० हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. सहाय्यक पोलिस निरीक्षक खांडवी तपास करीत आहे.