नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून एकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत तिघांनी बहिण भावास बेदम मारहाण केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात बापलेकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज पाटील,सागर पाटील व त्यांचे वडिल (रा.हिंदी शाळेजवळ,श्रमिकनगर) अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी संकेत प्रकाश पासलकर (रा.राधाकृष्ण मंदिराजवळ,श्रमिकनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार पासलकर यांचा भाऊ अनिकेत हा गेल्या सोमवारी (दि.१८) आपल्या कामावर जात असतांना ही घटना घडली. कामावर जाण्यापूर्वी तो मित्र अविनाश भरीत यास घेण्यासाठी हिंदी शाळा भागात गेला असता संशयीतांनी मागील भांडणाची कुरापत काढून तिघा बापलेकांनी त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी संतप्त सागर पाटील याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने अनिकेत जखमी झाला आहे. या घटनेनंतर बापलेकांनी पासलकर कुटुंबियांचे घर गाठून संकेत पासलकर आणि त्यांच्या बहिणीस शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.