नाशिक : घरात घुसून एकाने कुटुंबियास शिवीगाळ करीत तरूणीचा विनयभंग केल्याची घटना सातपूर परिसरात घडली. सदर तरूणी बायको असल्याची बतावणी करीत थेट तिचा खून करण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे.
देवेंद्र उर्फ सुंदर सुधाकर जगताप (२० रा.स्वारबाबानगर,जगतापवाडी) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात राहणा-या तरूणीने तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सन.२०१७ ते २०१८ मध्ये तरूणी दहावीत असतांना संशयीत तिचा पाठलाग करीत होता. गुरूवारी (दि.२१) रात्री त्याने युवतीचे घर गाठून कुटुंबियांना शिवीगाळ केली. यावेळी संतप्त संशयीताने युवतीस घराबाहेर ओढून माझी बायको आहेस असे म्हणून विनयभंग केला. तसेच तूला मारून टाकेल अशी धमकी दिल्याने भेदरलेल्या कुटुंबियांनी पोलीसात धाव घेतली असून संशयीतास पोलीसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.