नाशिक – एसबीआय बँकेचे योनो अॅप अपडेट करण्यासाठी पाठविलेल्या लिंकवर माहिती भरण्यास भाग पाडून भामट्यांनी एका डॉक्टरला सव्वा पाच लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. राहूल मधुकर बस्ते (वय ५२,रा.काठे गल्ली त्रिकोणी गार्डन जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी – डॉ. राहूल बस्ते यांना ९५४७८५८४५१ या मोबाईल क्रमांकावरुन एसबीआय योनो अॅप अपडेट करण्यासाठी लिंक पाठविली. बस्ते यांना लिंक वर माहीती भरायला लावून त्यांच्या खात्यातील ५ लाख २१ हजार ९६२ रुपयाला गंडा घातला.अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली तपास करीत आहेत.