अश्लील फोटाद्वारे ब्लॅकमेल; सायबर पोलीस ठाण्यात विनयभंगासह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल
नाशिक – ऑनलाईन पाळत ठेऊन अश्लील फोटा पाठवत एकाने महिलेस धमकविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात विनयभंगासह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश कपीलदेव सिंग उर्फ राज सिंग ( रा. सिंम्बायसीस शाळेच्या मागे, आश्वीनीनगर) असे संशयिताचे नाव आहे. यापोलिसांनी दिलेली माहीती नुसार संशयित हा एप्रिल महिन्यापासून पीडित महिलेचा ऑनलाईन पाठलाग करुन तिला शिवीगाळ करीत, विवस्त्र फोटो नातेवाईक व मित्रांना पाठविण्याची तसेच पॉर्न साईटवर अपलोड करण्याची धमकी देत होता. संशयीताच्या छळास कंटाळून महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली करीत आहे.
सिडकोत दोन दुचाकी लांबविली
नाशिक – सिडकोत साईबाबा नगरला बजाज प्लॅटिना दुचाकी चोरण्याचा प्रकार उघडकीस आला. अन्नपूर्णा प्यारेलाल जैस्वाल (वय ४५, साईबाबानगर, सिडको) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी – सिडकोतील साईबाबानगर परिसरात अन्नपूर्णा जैस्वाल यांनी त्यांची दुचाकी शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी राहत्या घरासमोरील पार्किंगमध्ये पार्क केली असतांना त्यांची काळ्या रंगाची बजाज कंपनीची प्लॅटिना (एमएच १५ एचएन ५८४७) चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार शेख तपास करीत आहे. दुसरी घटना इंदिरानगर परिसरात उघडकीस आली. इंदिरानगरला रथचक्र सोसायटीच्या पार्किंमगमधून चोरट्यांनी हिरो होंडा स्प्लेंडर चोरुन नेली. याप्रकरणी अक्षय रतनसिंह परदेशी (वय २९, सिंहस्थनगर ) यांच्या तक्रारीवरुन इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, परदेशी यांनी त्यांची दुचाकी २३ सप्टेंबरला रथचक्र सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावली असतांना चोरट्यांनी रात्रीतून त्यांची काळ्या रंगाची हिरो होंडा (एमएच १५ डीबी १४६६) ही चोरुन नेली. पोलिस हवालदार कोकाटे तपास करीत आहे.