जेल रोडला सव्वा लाखांची घरफोडी
नाशिक – जेल रोड भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्याचांदीच्या अलंकारांचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार बालाजी बकरे (वय ६६, नंदनवन बंगला, लक्ष्मीकेदार नगरी, सब स्टेशन जेल रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बकरे कुटूंबिय बुधवारी (दि.२०) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा लॅप लॉक कशाने तरी तोडून घरात प्रवेश करीत, तळमजल्यावरील बेड रुममधील लोखंडी कपाटातील लॉकर आणि पहिल्या मजल्यावरील बेडरुमच्या लाकडी कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले १० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, १० ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, ३ ग्रॅमच्या सोन्याची ठुशी, ६ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या तोरड्या, लक्ष्मीचे चांदीचे नाणे, चांदीची ४० ग्रॅमची समई, ५ ग्रॅमची चांदीची गणपतीची मुर्ती, चांदीची निरजंनी असा सुमारे सव्वा लाखांचा सोन्या चांदीचा ऐवज असा सुमारे १ लाख १३ हजार १०० रूपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक गिते करीत आहेत.
सिडकोत ७५ हजाराची घरफोडी
नाशिक – सिडकोतील शिवशक्ती चौक परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ७५ हजाराचा ऐवजावर डल्ला मारला. त्यास रोकड,सोन्याचांदीचे दागिणे आणि कॅमेºयाचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपुल प्रभाकर चव्हाण (वय ४२, सरस्वती चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चव्हाण कुटुंबिय रविवारी (दि.१७) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. दुस-या दिवशी कुटुंबिय परतले असता घरफोडीचा प्रकार समोर आला. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून किचनमधील लोखंडी कपाटातून निकॉन कंपनीचा कॅमेरा, १ ग्रॅमचे सोन्याचे मणी, तीन ग्रॅम सोन्याचे वेढे, ६ ग्रॅमची सोन्याची अंगठी, २ ग्रॅम सोन्याची अंगठी, साडे पाच हजाराच्या आसपास रोकड असा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.