बिटकॉईन मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १५ लाखाला गंडविले
नाशिक – बिटकॉईन गुंतवणुकीच्या नावाखाली एका महिला व्यवसायिकेला भामट्यांनी साडे पंधरा लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशश्री जगन्नाथ पवार (वय ४१, धनश्री साई गार्डन कॉलनी,भोसला ग्राउंड सातपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जुलै ते २७ आॅगस्ट दरम्यान ही घटना घडली. अज्ञात भामट्याने सोन्या चांदीच्या दागिण्याच्या ज्वेलरी व्यवसायीक महिलेशी सोशल मिडियाद्वारे संर्पक साधून ज्वेलरी व्यवसायात जागतीक संधी आहे. असे सांगून बिटकॉईन मध्ये गुंतवणूकीचे आमीष दाखवून फियार्दी यांच्याकडील सोन्याच्या चैनची डिझाईन बघण्याच्या बहाण्याने सोन्याच्या चैन पाठविण्यास लावून सुमारे १५ लाख ५७ हजार ४४६ रुपयांना गंडविले. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली तपास करीत आहे.
…..
पेठ रोडला राउ हॉटेलात एकाची आत्महत्या
नाशिक – पेठ रोडला कुमावत नगरला राउ हॉटेलमध्ये एकाची आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुनील भाउसाहेब आंधळे (वय ३३, कुमावतनगर, पेठ रोड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी गुरुवारी (दि. २१) पावने बाराच्या सुमारास राउ हॉटेलच्या रुम नंबर १०५ मध्ये दरवाजा उघडला जात नसल्याने हॉटेल कर्मचाºयांनी डुल्पीकेट चावीने रुमचा दरवाजा उघडला असता त्यात सुनील आंधळे याने चादरीने सिलींग फॅनला गळफास घेउन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अधिक तपास हवालदार ए.डी.सोनवणे तपास करीत आहेत.