नाशिक : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे पाच लाख रूपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. याप्रकरणी गंगापूर, भद्रकाली आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गंगापूररोड भागातील समिर रामदास बोधर्डे (रा.साईधाम सोसा.डिकेनगर पोलीस चौकी मागे) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बोधर्डे कुटुंबिय मंगळवारी (दि.१९) बाहेरगावी गेले असता अद्यात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील महागडे चार कॅमेरे, लेन्स, फ्लॅश चार्ज आणि सोन्याची अंगठी असा सुमारे ४ लाख ८८ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत. दुसरी घटना जुने नाशिक भागात घडली. याप्रकरणी जनसिंग मोहन ससाने (रा.एकतानगर,बोरगड) यांनी तक्रार दाखल केली आहे. ससाने कुटूंबिय दि.१७ ते २० ऑक्टोबर दरम्यान बोरगड येथे गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कथडा भागातील बंद घराचे कुलूप तोडून देवघरातील देवीचा मुकूट,छत्री कमरपट्टा आणि कपाटातील सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ९५ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत. तर भटू अशोक कांकरीया (रा.अंगन अपा.बाप्पा सिताराम चौक,हिरावाडी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कांकरीया कुटूंबिय बुधवारी (दि.२०) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेल्या सुमारे पाच हजार रूपये मुल्य असलेल्या वेगवेगळय़ा देशाच्या चलनी नोटा व नाणी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.
दोन मोटारसायकली चोरी
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरू असून,वेगवेगळय़ा ठिकाणी पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी मुंबईनाका आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संजय लालबहाद्दुर ठाकुर (रा.विजय अपा.विनयनगर) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एफके ०१६२ मंगळवारी (दि.१९) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत. दुसरी घटना जिल्हारूग्णालयात घडली. संदिप मधुकर तेली (रा.श्रमिकनगर,सातपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तेली मंगळवारी (दि.१९) कामानिमित्त जिल्हारूग्णालयात गेले होते. रेकॉर्ड रूम समोरील पार्किंगमध्ये लावलेली त्यांची एमएच १५ डीडी ६२८५ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक साबळे करीत आहेत.