नाशिक – भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला हा अपघात दिंडोरीरोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात कारचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज गणपत बेंडकुळे (रा.तळेगाव ता.दिंडोरी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. बेंडकुळे रविवारी (दि.१७) नाशिककडून दिंडोरीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर एमएच १५ एचई ९५४४ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. आरोग्य विज्ञान विद्यापीठ नजीकच्या महापालिका कमानी समोर दिंडोरीकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणा-या स्विफ्ट कारने एमएच ४६ पी ७७९८ दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात बेंडकुळे गंभीर जखमी झाला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी मृताचा भाऊ श्रावण बेंडकुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.
……
मंगळसूत्र दुचाकीस्वाराने ओरबाडून नेले
नाशिक : भाजीपाला खरेदी करून घराकडे परणा-या महिलेच्या गळय़ातील मंगळसुत्र दुचाकीस्वाराने ओरबाडून नेल्याची घटना अशोकामार्ग भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल उमेश खंडेलवाल (रा.अक्षरधाम रो हाऊस,अशोका हाऊस मागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. खंडेलवाल सोमवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास परिसरातील भाजीपाला मंडईत खरेदीसाठी गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करून त्या पायी घराकडे जात असतांना ही घटना घडली. अशोका हाऊस समोरून त्या पायी जात असतांना समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ््यातील मंगळसुत्र ओरबाडून फेम सिग्नलच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.
………