दारु पाजली नाही नाही म्हणून डोक्यात बियरची बाटली फोडली
नाशिक – दारु पाजली नाही नाही म्हणून गंजमाळ परिसरातील पंचशीलनगरला एकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून जखमी करण्याचा प्रकार उघडकीस आला.सोहील मोईद्दीन शेख असे संशयिताचे नाव आहे. शारदा विनोंद कंडारे यांच्या तक्रारीवरुन संशयिताविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी काल शनिवारी (ता.१६) मध्यवरात्री साडे बाराच्या सुमारास गंजमाळ परिसरातील सप्तश्रृंगी मंदीराजवळ तक्रारदार यांचा मुलगा निखील कंडारे हा त्याच्या बहिणीच्या घरी जात असतांना संशयित सोहील याने रस्त्यात अडवून त्याला शिवीगाळ करीत दारु पाजण्याचा आग्रह धरला त्यानंतर
त्याच्या हातातील बियरची बाटली मुलाच्या डोक्यात मारुन जखमी केले. पोलिस उपनिरीक्षक जे.के.माळी तपास करीत आहे.
वडनेर शिवारात चारचाकीच्या धडकेत तिघे जखमी
नाशिक – नाशिक रोडला वडनेर शिवारात चारचाकीच्या धडकेत तिघे जखमी झाले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हादाखल झाला आहे. योगेंद्र संजय इंगळे, त्यांची पत्नी योगेश्वरीव मेहुणा ईश्वर झोपे (सर्थनगर) असे अपघातात जखमी झालेल्यांचीनावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शनिवारी (ता.१६) वडनेर गेट परिसरातील दुपारी दोनच्या सुमारास जखमी हे त्यांच्या दुचाकी(एमएच १९ डीएफ १८११) हिच्यावरुन नाशिक रोड कडून वडनेर वडनेरमार्गे पाथर्डी रोड ने जात असतांना हांडोरे लॉन्स परिसरात समोरुनभरधाव रॉग साइडने येणाऱ्या एल्स वॅगन कार (एमएच ०३ बीबी९७८९) जोरात धडक दिल्याने तिघे जखमी झाले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.