खूनाला मदत करीत नाही म्हणून एकावर वार
नाशिक – खूनासाठी मदत करत नाही म्हणून देवळाली गावात दोघांनी एकाच्या पोटात वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या आहेत. राहूल पंडीत कुमावत (वय २६, जगताप मळा नाशिक रोड ) याच्या तक्रारीवरुन रोशन विश्वास लवटे व अजय सुकदेव सोनवणे (जय भवानी रोड ) यांच्या विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित रोशन लवटे याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शुक्रवारी (ता.१५) रात्री साडे आठच्या सुमारास देवळाली गावातील पाटील गॅरेज मागील परिसरात संशयित रोशन लवटे आणि अजय सोनवणे यांनी तक्रारदार राहूल कुमावत याला गाठून आपल्याला प्रशांत जाधव याचा गेम वाजवायचा आहे. त्याला राहूल यानेनकार दिल्याने तु काही कामाचा नाही. अस म्हणत रोशन याने अजयला तू याला मार असे सांगितले त्यावरुन अजय सोनवणे याने पोटात धारदार शस्त्राने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, महिला पोलिस उपनिरीक्षक सी.एम.शिंदे तपास करीत आहे. तर अजय सोनवणे यानेही राहूल कुमावत (वय २६,जगताप मळा) याच्या विरोधात तक्रार दिली असून त्यात, रोशन लवटे याने बोलावून घेत, आपल्याला प्रशांत जाधव व व सागर कोरणी यांचा गेम वाजवायचा आहे,. असे सांगून बालोवून घेतले तेथे राहूल कुमावतयाने शिवीगाळ करीत खाली पाडून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हवालदार कोकाटे तपास करीत आहेत.
…
राग आल्याने तिघांनी चॉपरने केला वार
नाशिक – मित्राला आवाज दिला याचा राग आल्याने तिघांनी एकावर चॉपरने वार केल्याचा प्रकार लोंखडे मळ्यात उघडकीस आला आहे.याप्रकरणी दीपक उर्फ डेमो भाउसाहेब जाधव, हनुमंतनगर, अक्षयधनशाम घरटे व अनिकेत मिलिंद ददेविकर उर्फ गोलू (महालक्ष्मीनगरदेशमुख भवन जेल रोड ) या तिघां विरोधात अक्षय भास्कर राठोडयाच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहीती अशी तक्रारदार अक्षय भास्कर राठोड, शुभम कापडनीस आणि ऋषीकेश बागूल हे सोबत असतांना त्यांनी अक्षय घरटेयाला आवाज दिला. त्याचा राग मनात धरुन शुक्रवारी (ता.१५) रात्रीसाडे दहाच्या सुमारास निर्सग गोविंद सोसायटी जवळ दीपक जाधव,अक्षय घरटे, आणि अनिकेत दिवेकर या तिघांनी चॉपरनेवार केले.याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक निरीक्षक एस.बी.खडके तपास करीत आहे.