ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यु
नाशिक – वडाळा नाका परिसरात साई प्रीतम हॉटेल समोर टिप्पर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यु झाला. रेखा कैलास पाटील (वय ४९, ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल मागे पार्थडी लिंक रोड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कैलास तोताराम पाटील यांच्या तक्रारीवरुन टिप्पर ट्रक (एचएच ०४ ईवाय ९३४) वरील चालका विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी कैलास तोताराम पाटील (वय ५४,) हे त्यांच्या दुचाकी (एमएच १५ सीजी १६०१) हिच्यावरुन शुक्रवारी (ता.१६) दुपारी सव्वा तीनला पत्नी रेखा यांच्यासह देवीचे घट विर्सजित करुन घरी परत जात असतांना वडाळा परिसरात साई प्रीतम हॉटेल समार पाठीमागून येणाऱ्या टिप्पर ट्रक (एमएच ०४ ईवाय ९३४) च्या चालकाचा ताबा सुटल्याने टिप्पर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात रेखा दुचाकीवरुन पडल्यानंतर ट्रक त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा मृत्यु झाला. रेखा यांच्या मृत्यु नंतर टिप्पर चालक तसाच पळून गेल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक गेंगजे तपास करीत आहेत.
दुचाकी चोरीला
नाशिक – द्वारका परिसरातील रस्त्यालगतच्या कावेरी हॉटेल परिसरात रस्त्यालगत दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला. किरण गोविंद सकट (वय ३२, संत कबीर नगर) यांच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शुक्रवारी (ता.१५) दुपारी दुपारी दीडच्या सुमारास किरण सकट यांनी त्यांची दुचाकी हिरो होंडा पॅशन (एमएच १७ बीएफ ४७६३) कावेरी हॉटेल जवळ लावली असतांना, अज्ञातत चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी
भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.