राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या शहराध्यक्षांसह ११ जणा विरोधात गुन्हा दाखल
नाशिक – दसरा निमित्ताने विना परवाना गर्दी जमवून रावण रुपीभाजपला पुतळा करुन आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या शहराध्यक्षांसह ११ जणा विरोधात गुन्हा दाखल झाला. मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी कॉग्रेस भवनासमोर शुक्रवारी(ता.१५) सायंकाळी साडे पाचला राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, यांच्यासह दहा ते अकरा जणांनी भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत कावसगतीने कामकाज होत असल्याचा निषेध करण्यासाठी भाजपचा निषेध करण्यासाठी रावणरुपी पुतळा तयार करुन विना परवाना गर्दी जमवून सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसविला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
बोगस किटकनाशकांच्या औषधाचा साठा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
नाशिक – विना परवाना शेती पिकावरील फवारणीचा बोगस किटकनाशकांच्या औषधाचा साठा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अभिजित घुमरे यांच्या तक्रारीवरुन गोपाल रघुनाथ बागड (दक्षहेरिटेज, देवळाली पाथर्डी रोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित बागडे यांचे इंदिरानगर परिसरातील अमीद्विप अपार्टमेंट येथे निर्मल एजन्सी नावाने औषध विक्रीचा गाळा सून १ आॅक्टोबरला दुपारीसाडे तीनला कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार संशयित बागडे यांनी त्यांच्या निर्मल एजन्सी किटक नाशक दुकानात विनापरवाना बेकायदेशीर बोगस किटक नाशकांचा साठा करुन विक्रीसाठीठेवला तसेच वितरणाचे प्रमाणपत्र नसतांना किटक नाशक नोंदणी न करता शासनाची शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी किटक नाशकाचा साठा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक बारेला तपास करीत आहेत.